कोल्हापूर | संपूर्ण राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरी केला जात आहे. परंतु आता गणपती विसर्जनाला देखील अवघे काही दिवसच उरले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून काही महत्वाचे निर्बंध लादण्यात आले आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री बारानंतर नियमातील साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकी वेळी मध्यरात्री 12 नंतर शांतता राहणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजीच रात्री बारापर्यंत नियमातील साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी असेल. मात्र रात्रीच्या बारानंतर सिस्टीमस नव्हे तर पारंपारिक वाद्यही वाजवण्यास परवानगी नसेल. पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या या निर्देशांमुळे गणेशभक्तांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. परंतु तरी देखील या नियमांचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक असणार आहे.
गणेश विसर्जनाच्या काळात मिरवणुकीवेळी अनेक मोठमोठ्या साऊंड सिस्टिम लावण्यात येतात. तसेच, पारंपारिक वाद्यांचा देखील वापर केला जातो. उत्साहाच्या भरात गणेश भक्तांकडे वेळेचे भानू उरत नाही. त्यामुळे रात्री एक, दोन वाजेपर्यंत साऊंड लावून मिरवणुका काढल्या जातात. याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो. या कारणामुळेच गणेश विसर्जनाच्या दिवशी साऊंड सिस्टिम वाजवण्यावर बंदी ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या बारानंतर मिरवणुकीमध्ये कोणतेही साऊंड सिस्टिम वापरण्यास बंदी असेल.
मुख्य म्हणजे, यामुळे आता गणेशभक्तांना पुढील तीन दिवसच रात्री बारापर्यंत साऊंड स्पीकरचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर, गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी सुद्धा आवाजाची मर्यादा आणि वेळ पाळावी लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास शहर पोलिसांकडून संबंधित मंडळांवर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, साऊंड सिस्टिमच्या मालकावर देखील कारवाई केली जाईल. त्यामुळे यावर्षीच्या गणेश विसर्जनावेळी शांतता राहणार आहे.