गणेशोत्सव काळात पुण्यात ड्रोन वापरण्यास बंदी; आदेशांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

drone ban
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून यासंबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये गणपती मंडळांचे किंवा गणपती बाप्पाचे शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. गणेशोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून पोलिसांकडून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या निर्देशांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे.

सध्या संपूर्ण राज्यात गणेश उत्सव जल्लोषात साजरी केला जात आहे. अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक ड्रोन व्हिज्युअल्स अपलोड झाल्याचे विशेष शाखेच्या पथकाच्या निदर्शनात आल आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात ड्रोनचा वापर टाळण्याप्रकरणी आदेश जारी करण्यात आले आहेत. फक्त सुरक्षितेसाठी पोलिसांकडून जे ड्रोन वापरण्यात येतील त्यांना सूट देण्यात आली आहे. परंतु त्याऐवजी इतर कोणी ड्रोनचा वापर केला तर त्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

गणेशोत्सवदरम्यान लक्ष्मी रोड येथे ड्रोनद्वारे व्हिडीओ शूटिंग करुन त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्य पथकाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षितेच्या दृष्टीने पाऊले उचलत पोलिसांनी ड्रोन वापरण्यावर बंदी आणली आहे. फक्त या ड्रोनचा वापर गणेशोत्सवाच्या काळात करू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. जर कोणत्या व्यक्तीने या आदेशांचे उल्लंघन केले तर त्यावर Aircraft Act, Drone Rule, IPC कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, येत्या 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत दरम्यान पुणे शहरात ड्रोन वापरण्यावर बंदी असेल. त्याचबरोबर, मायक्रो लाईट्स, हॅण्ड ग्लायडर, पॅरामोटर, हॉट एअर बलूनच्या अशा गोष्टींवर देखील पोलिसांनी बंदी आणली आहे. मुख्य म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. पुण्यात गणेशभक्तांच्या सुरक्षितेची काळजी घेण्यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त राबवण्यात आला आहे.