सार्वमत घेतल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बर्लिन । स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) जनमत (Referendum) झाल्यानंतर आता मुस्लिम महिलांना (Muslim women) सार्वजनिक ठिकाणी हिजाब आणि बुरखा घालण्यास बंदी घातली गेली आहे. स्वित्झर्लंडच्या आधी फ्रान्स, बेल्जियम आणि ऑस्ट्रिया येथेही यावर बंदी घालण्यात आली होती. स्वित्झर्लंडमध्ये सार्वमत घेण्यात आले, ज्यात 51 टक्के लोकांनी बुरखा आणि हिजाब बंदी घालण्याच्या बाजूने मतदान केले.

या सार्वमत मतदानानंतर मुस्लिम महिलांना स्वित्झर्लंडमधील रेस्टॉरंट्स, क्रीडांगण आणि सार्वजनिक ठिकाणी हिजाब आणि बुरखा घालून यापुढे आपला चेहरा झाकता येणार नाहीत. तथापि, सार्वमत प्रस्तावाचा स्वित्झर्लंडच्या संसदेने आणि देशातील संघराज्य सरकार बनविलेल्या सात सदस्यीय कार्यकारी समितीने विरोध दर्शविला आहे.

या प्रस्तावात धार्मिक ठिकाणी जाताना चेहरा झाकून घेता येईल. यासह, कोरोना महामारी लक्षात घेता, चेहऱ्यावर मास्क लावण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मुस्लिम महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालायला परवानगी द्यायची की नाही याबाबत स्वित्झर्लंडमध्ये बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. याचा निर्णय घेण्यासाठी सार्वमत घेण्यात आला, ज्यावर स्वित्झर्लंडच्या लोकांनी 7 मार्च रोजी मतदान केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment