ही काय फक्त भाजपची मक्तेदारी आहे का?; अजितदादा भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारचा दुसरा आणि करोना काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली. मागच्याच सरकारच्या योजनांची या सरकारने घोषणा केल्याचा आरोप विरोधकांनी केल्याचा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा
विकासाच्या योजना या केवळ भाजपची मक्तेदारी आहे काय? असा सवाल करत अजितदादा भडकले.

आम्ही शेतकऱ्यांपासून महिलांच्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजना काय भाजपची मक्तेदारी आहे का? त्या काय भाजपच्या योजना आहेत का? असा सवाल त्यांनी केला. आम्ही काही साधूसंत नाही. पण जनतेला पटेल आणि रुचेल अशा योजना आम्ही दिल्या आहेत, असं ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केल्याकडेही अजितदादांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर पुणे, नाशिक आणि जालना हे काय मुंबई महापालिकेत आहे का?, आम्ही ग्रामीण भागात दहा हजार कोटींचे रस्ते बांधणार आहोत, ते काय मुंबई पालिकेत येतात का?,असा सवाल अजित पवारांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’