बंडातात्या कराडकरांचं वादग्रस्त वक्तव्य; महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बंडातात्या कराडकर म्हणाले, स्वातंत्र्य हे महामा गांधी याच्या अहिंसावादामुळे नव्हे तर क्रांतिकारकांमुळे मिळाले आहे. महात्मा गांधी यांचे हिंदुत्व आणि अहिंसावाद हे दोन्हीही पक्षपातीच आहेत. 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने नाही तर 1942 क्रांतीकारक चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला.

क्रांतीकारक भगतसिंगाच्या मनात महात्मा गाधींची छाप होती. मात्र महात्मा गांधीजीचा अंहिसावाद भगतसिंगाच्या मनात ठसावला होता. आपल्या देशाला स्वातंत्र अंहिसक मार्गाने मिळवायचे हा भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. जालियनवाला वाला हत्याकांडाला गाधींनी समर्थन द्यायला नकार दिल्यानंतर भगतसिंग आणि गांधीजी यांच्यात नाराजी उभी राहिली.

भगतसिंग यांच्या मनावर परिणाम झाला की या म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) मार्गाने जाण्याचे कारण नाही. ते त्यानंतर क्रांतिकारक बनले. या दरम्यान लोकमान्य टिळकांची आठवण करुन देत या म्हाताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर 1 हजार वर्ष लागली असती, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं.