Wednesday, October 5, 2022

Buy now

द्रोणाचार्य अकॅडमीत प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीला काठीने मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

अकॅडमीत सराव करताना थकवा आल्याने ग्राऊंडवर बसल्याने प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीला काठीने मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. खटाव तालुक्यातील दरूज येथील द्रोणाचार्य अकॅडमीतील हा प्रकार घडला. सरावात आई- वडिलांचा उल्लेख करत शिवीगाळ करू नका असे म्हटल्याने विद्यार्थींनाला प्रशिक्षकाने काठीने मारहाण केली आहे.

पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरुज येथील द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेली मुंबई- ठाणे येथील सिमरन दौलत खान या विद्यार्थिनीस येथील प्रशिक्षक जगन्नाथ बाबा साठे (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) या शिक्षकाने काठीने मारहाण करून शिवीगाळ केली.

सिमरनला थकवा आल्याने ग्राउंड वर बसली असता प्रशिक्षक जगन्नाथ बाबा साठे यांनी बसल्या कारणाने उठण्यास सांगितले. तसेच आई- वडिलांचा वरून शिवीगाळ केली. त्यावेळेस सिमरन खान हिने आईवडिलांवरून शिवीगाळ करू नका असे म्हणताच. पुन्हा प्रशिक्षक साठे यांनी शिवीगाळ करून हातातील काठीने दोन्ही पायाचे लवणीवर व लवणी खाली मारहाण केली. तसेच मारल्याबाबत कोणाकडे तक्रार केल्यावर तुझ्याकडे बघून घेईल अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहेत. पुढील तपास पोलीस हवलदार एस. एस. भोसले करीत आहेत.