Bandhan Bank च्या ‘या’ FD वर आता मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bandhan Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Bandhan Bank ने ₹2 कोटींवरील बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Bandhan Bank revises bulk FD rates, now fetching returns up to 8% | Mint

28 डिसेंबर 2022 पासून पासून नवीन दर लागू

Bandhan Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, यानंतर आता बँकेकडून सध्या 365 दिवसांपासून ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कॉलेबल बल्क डिपॉझिटवर जास्तीत जास्त 7.90% व्याज दर दिला जात आहे. तसेच, बँक नॉन-कॉलेबल बल्क डिपॉझिट्सवर नमूद केलेल्या मुदतींवर जास्तीत जास्त 8.15% व्याज दर दिला जात आहे. तसेच बँक आता 7 ते 15 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 5.00% आणि 16 ते 90 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 5.80% व्याजदर देत आहे.

Bandhan Bank Hikes FD Rates Up To 7 70 Without Premature Withdrawals - BW  Businessworld

Bandhan Bank बल्क एफडी दर (अकाली पेमेंट सुविधा)

91 ते 180 दिवसांच्या एफडीवर आता 6.25%,181 ते 364 दिवसांच्या एफडीवर आता 6.75%, 365 दिवसांपासून ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या एफडीवर 7.90% आणि 15 महिने ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या एफडीवर 6.15%, 5 वर्षे ते 10 वर्षांच्या घाऊक कालावधीच्या एफडीवर 5.00% व्याज दर देत आहे.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

Bandhan Bank बल्क एफडी दर (अकाली पेमेंट सुविधेशिवाय)

तसेच आता बँक 7 दिवस ते 15 दिवसांच्या एफडीवर 5.00%,16 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 5.80%, 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 6.30%, 91 दिवस ते 364 दिवसांच्या एफडीवर आता 7.40% व्याजदर मिळेल.

त्याच प्रमाणे बंधन बँक आता 366 दिवसांपासून ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 8.15%,15 महिने ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या घाऊक एफडीवर 7.40% व्याजदर ऑफर करत आहे. आपल्या वेबसाइटवर बंधन बँकेने सांगितले की, “अकाली पैसे काढल्यास, संबंधित ROI वर 1% दंड आकारला जाईल.”

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://bandhanbank.com/personal/fixed-deposits

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये