औरंगाबाद | बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून बँक अधिकारी, कर्मचारी दोन दिवसांपासून संपावर गेल्याने ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. शहर आणि ग्रामीण भागात संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल तीन हजार बँक कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला.
सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनतर्फे १५ आणि १६ मार्च रोजी संप पुकारण्यात आला आहे. संपात विविध बँक संघटनांनी सहभाग नोंदविला. शहरातील सिडको, टीव्ही सेंटर, शहागंज, मिलकॉर्नर, पैठणगेट, रेल्वेस्टेशन, सेव्हन हील, अमरप्रीत चौक,क्रांतीचौक यासह प्रमुख बँकांसमोर सकाळी १० वाजेपासून बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गटागटाने उभे राहून नागरिकांना माहितीपत्रकाचो वाटप केले.
यावेळी सार्वजनिक बँकांचे खासगीकरण झाल्यास काय परिणाम होईल यासंदर्भात नागरिकांना माहिती देण्यात आली. काळ्या फिती लावून आणि गळ्यात बँक बचाओ, देश बचाओ असे पोस्टर अडकवून कर्मचारी सहभागी झाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.