हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : गेल्या महिन्यात RBI कडून आपल्या रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्स किंवा 0.40 टक्के वाढ करण्यात आली होती. यानंतर एकीकडे बँकांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होत आहे तर दुसरीकडे बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. अशातच आता सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
इंडियन बँकेकडून विविध कालावधीच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या देशांतर्गत टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 2.80 टक्के ते 5.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 1 जून 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या टर्म डिपॉझिट्ससाठीचे व्याजदर हे फक्त एकाच कालावधीसाठी वाढविण्यात आले आहेत. ज्या अंतर्गत, बँक आता 181 दिवसांपासून ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 3.9 टक्के व्याज देईल. Bank FD
तसेच 29 दिवसांपेक्षा कमीच्या टर्म डिपॉझिट्ससाठी बँक आपला जुनाच व्याजदर ठेवेल. त्याचबरोबर 30 ते 45 दिवसांच्या FD चे व्याजदर 3.00 टक्के असेल. 46 दिवस ते 90 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.25 टक्के व्याजदर कायम राहील तर 91 दिवसांपासून ते 130 दिवसांपर्यंतच्या FD वर 3.50 टक्के व्याजदर दिला जाईल. 121 ते 180 दिवसांच्या टर्म डिपॉझिट्सवर 3.75 टक्के व्याज मिळेल. Bank FD
181 दिवसांपासून एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. आता 1 वर्षाच्या FD वर बँकेकडून 5.10 टक्के व्याज मिळेल. एक वर्षापेक्षा जास्त मात्र दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर आता 5.20 टक्के व्याज मिळणार आहे. 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमीच्या टर्म डिपॉझिट्सवर 5.25 टक्के व्याज मिळेल. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianbank.in/departments/deposit-rates/
हे पण वाचा :
Fixed deposits : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Upcoming cars : इलेक्ट्रिक आणि SUV सहित जूनमध्ये लॉन्च होणार ‘या’ 4 सर्वोत्कृष्ट कार !!!
HDFC : ‘या’ कंपनीच्या होम लोनवरील व्याजदरात एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ !!!
EPFO : कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार