हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : गुंतवणुकीच्या लोकप्रिय पर्यायांपैकी फिक्स्ड डिपॉझिट हा एक आहे. यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित तर असतेच त्याचबरोबर यामध्ये निश्चित रिटर्नही मिळतो. तसेच यामध्ये चक्रवाढीच्या मदतीने जमा झालेली रक्कम लक्षणीयरित्या वाढते. मात्र हे लक्षात घ्या कि, RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या एफडीवरील व्याज दरांमध्ये बदल करण्यात आले आहेत. Bank FD
सध्याच्या काळात जवळपास सर्वच बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे, तेव्हा आत कोणत्या बँकेकडून ग्राहकांना सर्वाधिक व्यजदर दिला जातो आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. आज आपण SBI, PNB आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वेगवेगळ्या कालावधीतील FD दरांची तुलना करून यांपैकी कोणती बँक सर्वाधिक व्याजदर देत आहे ते जाणून घेउयात… मात्र हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्ससाठी असतील हे लक्षात घ्या. Bank FD
PNB चे FD वरील व्याज दर
PNB कडून 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के, 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के आणि 91 ते 179 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज दिले जात आहे. यानंतर, बँकेकडून 180 दिवस ते 270 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या 271 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के, 1 वर्षाच्या FD वर 5.50 टक्के, 1 वर्ष ते 404 दिवसांपेक्षा जास्तच्या FD वर 5.50 टक्के, 405 दिवसांच्या FD वर 6.10 टक्के आणि 406 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. त्याचप्रमाणे 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.60 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.75 टक्के आणि 5 ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.65 टक्के व्याज मिळेल. हे लक्षात घ्या कि, 1 टेन्योर सोडून बाकी सर्व कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जात आहे. तसेच फक्त फक्त 5 ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे. Bank FD
बँक ऑफ बडोदाचे FD वरील व्याज दर
बँक ऑफ बडोदा कडून ग्राहकांना 7-45 दिवसांच्या FD वर 3 टक्के, 46-90 आणि 91-180 दिवसांच्या FD वर 4 टक्के, 181-270 आणि 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.65 टक्के व्याज दिले जात आहे. यानंतर, बँक 1 वर्ष, 1 वर्षापासून 400 दिवसांपेक्षा जास्त आणि 400 दिवस ते 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 5.50 टक्के, 2 ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 5.55% व्याज देत आहे. त्याच प्रमाणे बँक 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.65 टक्के, 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 5.10 टक्के व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 6.65 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 5 ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर उपलब्ध आहे. Bank FD
SBI चे FD वरील व्याज दर
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या SBI कडून 7 ते 45 दिवसांच्या FD वर 2.90 टक्के व्याज दिले जात आहे. यानंतर 46-179 दिवसांच्या एफडीवर 3.90 टक्के, 180-210 दिवसांच्या एफडीवर 4.55 टक्के, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.6 टक्के, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.45 टक्के आणि 2 वर्षापासून ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. याच बरोबर बँक 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.60 टक्के आणि 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.65 टक्के व्याज देत आहे. हे लक्षात घ्या कि, या सर्व कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जात आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/deposits-interest-rates
हे पण वाचा :
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या
Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा
PNB कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याजदर, नवीन दर तपासा
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
चांगला Password तयार करण्यासाठी वापरा ‘या’ खास टिप्स !!!