हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान, आता बंधन बँकेने देखील आपल्या एफडीवरील व्याज दरात वाढ केली आहे. हि दरवाढ 2 कोटी ते 50 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर लागू असेल.
आता बंधन बँक प्री-मॅच्युअर पैसे काढण्याच्या सुविधेसह एफडीवर 7.25 टक्के आणि प्री-मॅच्युअर सुविधेशिवाय एफडीवर 7.7 टक्क्यांपर्यंत व्याज देईल. 21 सप्टेंबरपासून हे नवे व्याजदर लागू झाले आहेत. एफडीमध्ये सुरक्षित गुंतवणूकीबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. Bank FD
प्री-मॅच्युअर पेमेंटच्या सुविधेसह अशा प्रकारे व्याज मिळेल
प्री-मॅच्युअर पेमेंटच्या सुविधेसह, बंधन बँकेकडून आता 365 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.25% व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, 91 दिवस ते 364 दिवस आणि 15 महिने ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ग्राहकांना 6 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर आता ग्राहकांना 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 5.05 टक्के, 5 वर्षे ते 10 वर्षांच्या FD वर 5 टक्के आणि 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के ते 3.75 टक्के व्याज मिळेल. Bank FD
प्री-मॅच्युअर सुविधेशिवाय इतके व्याज मिळेल
त्याच बरोबर आता एखाद्या ग्राहकाने प्री-मॅच्युअर सुविधेशिवाय एफडी केली तर बंधन बँकेकडून त्यावर जास्त व्याज दिले जाईल. आता बँक 365 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या आणि 2 कोटी ते 50 कोटी किंवा त्याहून जास्त रकमेच्या एफडीवर 7.70 टक्के व्याज देईल. तसेच 91 ते 364 दिवस आणि 15 महिने ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. Bank FD
त्याच प्रमाणे 91 ते 180 दिवसांच्या FD वर 6.75 टक्के, 46 ते 90 दिवसांच्या FD वर 6.30 टक्के, 5 ते 10 वर्षाच्या FD वर 5.50 टक्के आणि 7 ते 45 दिवसांच्या FD वर 3.25 ते 3.75 टक्के दराने व्याज मिळेल. Bank FD
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://bandhanbank.com/rates-charges
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर तपासा
EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत खातेदाराला मिळतो 7 लाख रुपयांचा मोफत विमा, त्याबाबत जाणून घ्या
FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज
Train Cancelled : रेल्वेकडून आज 200 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा