यामुळे वाढले विराट आणि धोनीच टेन्शन…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 19 नोव्हेंबर पासून IPL ला सुरुवात होतेय पण, आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश अनिश्चित आहे. आफ्रिकेचे १० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणे अशक्य आहे. त्यात एबी डिव्हिलियर्स , क्विंटन डी’कॉक यांचा समावेश आहे.

कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत कठोर लॉकडाऊन आहे आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंद आहे. आफ्रिकन देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमान वाहतूक कधी सुरू होईल याची कल्पना नाही.दक्षिण आफ्रिकेच्या सीमाही बंद केल्या आहेत. १८ ऑगस्टपासून कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरू होत आहे. त्यातही आफ्रिकेच्या खेळाडूंच्या समावेशाबाबत साशंकता आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका खेळाडूंना नक्कीच ना हरकत प्रमाणपत्र देईल, परंतु विमान वाहतूक सुरू करणे आमच्या हातात नाही,” असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मीडिया मॅनेजर कोकेत्सो गाओफेटोग यांनी सांगितले आहे.  भारताप्रमाणे आफ्रिकेलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. आतापर्यंत तेथे 4.21 लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद आहे आणि फक्त आप्तकालीन परिस्थितीतच प्रवासाला सरकारकडून परवानगी आहे

आफ्रिकन खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी न झाल्यास, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघांना सर्वाधिक फटका बसू शकतो. दोन्ही संघांत प्रत्येकी 3 आफ्रिकन खेळाडू आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment