हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : सप्टेंबरचा महिना निम्मा उलटून गेला आहे. आता या महिन्यात बँकांना एकूण 13 दिवस सुट्टी होत्या. त्यापैकी आतापर्यंत 8 सुट्ट्या येऊन गेल्या आहेत. तर आता या महिन्याच्या उरलेल्या दिवसांमध्ये बँकांना 5 दिवस सुट्या असणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर काही महत्त्वाच्या कामासाठी आपण बँकेत जाणार असाल तर बँकांच्या सुट्ट्यांची माहिती जाणून घ्या.
RBI कडून प्रत्येक कॅलेंडर वर्षात बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट जरी केली जाते. इथे हे लक्षात घ्या की, यापैकी अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय पातळीवरील असतात. त्या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील. मात्र त्याच वेळी, काही सुट्ट्या या स्थानिक असतात. त्या दिवशी फक्त काही राज्यांमध्येच लागू होतात. वेगवेगळ्या राज्यांसाठी आणि प्रदेशांसाठी सुट्ट्यांची लिस्ट देखील वेगवेगळी आहे. Bank Holiday
सेवा ऑनलाइन असल्याने फारशी अडचण नाही
सध्या बँकांकडून बहुतेंक सेवा या ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशातच मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगमुळे ग्राहकांच्या अनेक अडचणी कमी झाल्या आहेत. यामुळेच आता बँक बंद असतानाही बँकेशी संबंधित अनेक कामे करता येतात. मात्र काही अशी कामे देखील आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. त्यामुळे बँका बंद असताना अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात. त्यामुळे प्रत्येक बँक ग्राहकाने बँकेच्या सुट्ट्यांची माहिती घेत राहावी जेणेकरुन बँकिंगचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते सुट्टीच्या दिवसापूर्वी निकाली काढता येईल. Bank Holiday
सुट्ट्यांची लिस्ट तपासा (Bank Holiday)
18 सप्टेंबर 2022 – रविवारी बँका बंद राहतील.
21 सप्टेंबर 2022 – श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त तिरुवनंतपुरम, कोची येथे बँका बंद राहतील.
24 सप्टेंबर 2022 – चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.
25 सप्टेंबर 2022 – रविवारी साप्ताहिक सुट्टी.
26 सप्टेंबर 2022 – जयपूर आणि इम्फाळमध्ये नवरात्रीच्या स्थापनेनिमित्त बँकेला सुट्टी असेल. Bank Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : आज सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर पहा
LIC च्या ‘या’ योजनेत दरमहा 45 रुपये जमा करून मिळवा 25 लाख रुपये
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी सोबत मिळवा डेली 2GB डेटा
Multibagger Stock : पतंजली फूड्सच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात दिला 39,000% रिटर्न !!!