हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bank Holiday : जर आपण येत्या आठवड्यात बँकेमध्ये काही महत्वाच्या कामानिमित्त जाणार असाल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची ठरेल. कारण RBI ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात बँका 7 ते 5 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याआधी आपल्या शहरातील बँका सुरू आहेत की नाही याची आधीच माहिती घ्या.
हे लक्षात घ्या कि, ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी RBI अगोदरच बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट जारी करते. RBI च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, या सुट्ट्या प्रत्येक राज्यांनुसार वेगवेगळ्या असतील. यातील काही दिवशी संपूर्ण देशातील बँका एकत्र बंद राहणार नाहीत. Bank Holiday
पुढील आठवड्यात बँका कधी बंद राहणार ते जाणून घ्या (Bank Holiday)
>> 23 जानेवारी 2023 – सोमवार- (नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील)
>> 25 जानेवारी 2023 – बुधवार- (हिमाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त सुट्टी असेल)
>> 26 जानेवारी 2023 – गुरुवार – (प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील)
>> 28 जानेवारी 2023 – चौथा शनिवार
>> 29 जानेवारी 2023 – रविवार
बँकेकडून माहिती देताना सांगण्यात आले आहे की, या दिवशी फक्त शाखाच बंद राहतील, मात्र ग्राहकांना ऑनलाइन सेवा वापरता येतील. यावेळी नेट बँकिंगसहीत कोणत्याही बँकेच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल. त्यावर बँकेच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. Bank Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!