हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : देशभरातील जवळपास सर्वच बँकाकडून ऑनलाईन सुविधा दिल्या जातात. मात्र अशीही काही असतात जी बँकेत जाऊनच पूर्ण करावी लागतात. तसेच काही कामे ऑनलाइन न झाल्यास ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावेच लागते. त्यामुळे बँकेत जाण्याआधी आपल्याकडे बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. ते हे जाणून घ्या कि येत्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत.
मात्र इथे हे लक्षात ठेवा की जुलैमध्ये देशभरातील सर्व बँका 14 दिवस बंद राहणार नाहीत. कारण RBI ने ठरवलेल्या काही सुट्ट्या या प्रादेशिक आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यांनुसार सुट्ट्यांची लिस्ट देखील वेगवेगळी असते. त्यामुळे काही विशेष दिवशी फक्त काही राज्यांमध्येच बँका बंद राहतील, मात्र इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणेच सुरू राहील. Bank Holidays
RBI कडून दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी केले जाते, ज्यामध्ये प्रत्येक राज्यानुसार येणाऱ्या बँकांच्या सुट्ट्यांची माहिती दिली जाते. या कॅलेंडरमध्ये कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या बँकांच्या शाखा कोणत्या तारखांना बंद राहतील त्याबाबत माहिती देण्यात येते. हे लक्षात घ्या कि, देशभरात महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि सर्व रविवारी बँका बंद असतात. याशिवाय राजपत्रित सुट्टीच्या दिवशीही सर्व बँकांना सुट्टी दिली जाते. Bank Holidays
जुलै 2022 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट
1 जुलै: कांग (रथजत्रा) / रथयात्रा – भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये बँका बंद राहतील
3 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
७ जुलै : खारची पूजा- आगरतळ्यात बँका बंद राहणार आहेत
9 जुलै: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), ईद-उल-अधा (बकरीद)
10 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 जुलै: जम्मू आणि श्रीनगरमध्ये एझ-उल-अझा- बँका बंद राहतील
13 जुलै: भानू जयंती- गंगटोकमध्ये बँका बंद राहतील
14 जुलै: बेन डिएनक्लम – शिलाँगमध्ये बँका बंद राहतील
16 जुलै: हरेला-डेहराडूनमध्ये बँका बंद राहतील
17 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 जुलै: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
24 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 जुलै: केर पूजा- आगरतळामध्ये बँका बंद राहतील
31 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी) Bank Holidays
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today :सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर पहा
Adani Group च्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 100 टक्क्यांवर रिटर्न !!!
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!
IRCTC खाते आधारशी ऑनलाइन लिंक करण्यासाठीची प्रोसेस समजून घ्या