Bank holidays – या आठवड्यात बँक 5 दिवस राहणार बंद, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑक्टोबर हा बँकांच्या सुट्ट्यांनी भरलेला महिना आहे. याचे कारण म्हणजे सर्व मोठे सण याच महिन्यात येतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार या आठवड्यात देशभरातील अनेक शहरांमध्ये बँका 5 दिवस बंद राहतील. येत्या काही दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्यात विविध झोनमध्ये एकूण 7 दिवस सुट्ट्या असतील. या सुट्ट्या रविवार आणि महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पडत आहेत. ऑक्टोबर महिन्यात अनेक सण येत आहेत, ज्यामुळे या महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची लिस्टही मोठी आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन काही काम करायचे असेल तर घर सोडण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा. हे तुम्हाला अनावश्यक त्रासांपासून वाचवेल. सर्व बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात, तर काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सुट्ट्या असतात.

बँका कधी बंद असतील हे जाणून घ्या
19 ऑक्टोबर: ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलदुन्नबी/मिलाद-ए-शरीफ (पैगंबर मुहम्मद यांचा वाढदिवस)/बारावाफत. अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका या दिवशी बंद राहतील.
20 ऑक्टोबर: महर्षि वाल्मिकी जयंती/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलादच्या निमित्ताने अगरतला, बेंगळुरू, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
22 ऑक्टोबर: ईद-ए-मिलाद-उल-नबीनंतर शुक्रवारी (जम्मू, श्रीनगर) बँका बंद राहतील
23 ऑक्टोबर: चौथा शनिवार
24 ऑक्टोबर: रविवार
26 ऑक्टोबर: जम्मू आणि श्रीनगरमधील बँका 26 ऑक्टोबर रोजी परिग्रहण दिवशी बंद राहतील.
31 ऑक्टोबर: रविवार

या कामांवर परिणाम होईल
बँकांचे बहुतेक काम ऑनलाईन झाले आहे, तरीही चेक क्लिअरन्स किंवा KYC सारख्या काही महत्वाच्या कामासाठी बँकेला भेट देण्याची गरज आहे. कामातून सुट्टी असताना बँकांमध्ये KYC अपडेट करण्यासारख्या कामात समस्या आहे. याशिवाय चेक क्लिअरन्सच्या प्रक्रियेतही उशीर होतो.

Leave a Comment