हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींसाठी आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. अशावेळी आपण बँकेकडून कर्ज घेतो. तसेच एकदा कर्ज घेतल्यानंतर त्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्याचा EMI देखील भरावा लागतो. मात्र जर कधी कर्जाचा ईएमआय फेडता नाही आला तर त्यासाठी दंड आकारला जातो.
याबाबत CLXNS (कलेक्शन्स) MD आणि CEO असलेल्या मानवजीत सिंग सांगतात कि,” जर कधी आपण कर्जाची रक्कम वेळेवर परत करू शकत नसाल तर त्यासाठी सुरुवातीपासूनच काही पावले उचलायला हवीत. जसे कि, कर्जाचा कालावधी वाढवणे, यामुळे EMI कमी होईल. तसेच, कर्जाच्या अटींबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपली आर्थिक परिस्थिती आणि लोन रिस्ट्रक्चरिंग करणे देखील फायद्याचे ठरू शकेल.” Bank Loan
मानवजीत सिंह पुढे म्हणतात की,”जर असे करूनही आपण कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर लोन डिफॉल्टर म्हणून आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी. कायद्यानुसार, कोणतीही वित्तीय संस्थेकडून आपल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी पावले उचलली जातील. मात्र, असे करत असताना कर्जदाराकडून आणि बँकांकडून यासंबंधित नियमांचे योग्यपणे पालन केले जाणे गरजेचे आहे. तसेच कर्ज घेणाऱ्यांनाही काही अधिकार आहेत, याची माहिती असणे कधीही उपयोगी ठरेल. Bank Loan
म्हणणे मांडण्याचा अधिकार
हे लक्षात घ्या कि, लोन डिफॉल्टर म्हणून आपल्याला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. याअंतर्गत आपण कर्जाची परतफेड का करू शकत नाही याची कारणे स्पष्ट करून ती लोन ऑफिसरला पाठवू शकता. तसेच, जर आपण कर्जाची रक्कम परत करू शकत नसाल आणि आपल्याला यासंबंधित बँकेकडून अधिकृत नोटीस मिळाली असेल, तर फोरक्लोजर नोटीसवर कोणत्याही आक्षेपांसहीत अधिकार्यांना निवेदन करण्याचा अधिकारही आपल्याकडे आहे.
कराराच्या अटींचा अधिकार
सिंग यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही बँक अथवा थर्ड पार्टी रिकव्हरी एजंट कर्जदाराला कर्जाची रक्कम परत करण्याबाबत सक्ती करू शकत नाही. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वसूलीसाठी आउटसोर्सिंग करताना बँकांना आचारसंहितेचे पालन करावे लागेल आणि ग्राहकांना अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यासाठी प्रशिक्षित एजंट निवडावे लागतील. तसेच त्यांना कॉलिंग करण्याची वेळ आणि ग्राहकांच्या माहितीच्या गोपनीयतेची जाणीव असावी. रिकव्हरीची वेळ आणि ठिकाण आधीच निश्चित केले जाऊ शकते. उदाहरणार्थ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दरम्यान. Bank Loan
योग्य वागणूक मिळवण्याचा अधिकार
सिंग म्हणतात कि, प्रत्येक कर्जदाराला योग्य वागणूक मिळवण्याचा हक्क आहे. जर बँकेचा/ सावकाराचा प्रतिनिधी आपल्यावर ओरडत असेल किंवा आपल्याला शारीरिक इजा करत असेल किंवा धमकी देत असेल तर आपण याबाबत कायदेशीर तक्रार करू शकता. तसेच असे करताना बँकेला/ सावकाराला आपल्या रिकव्हरी एजंटचे डिटेल्सही आपल्यासोबत शेअर करावे लागतील. यावेळी एजंटने भेटताना आपल्या गोपनीयतेचा आदर करून सभ्य वागणूक दिली पाहिजे.Bank Loan
योग्य किंमत मिळवण्याचा अधिकार
जर आपण थकबाकी भरु शकत नसाल आणि बँकेने पेमेंट वसूल करण्यासाठी आपल्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असेल तर बँकेकडून याबाबत आपल्याला नोटीस मिळायला हवी. ज्यामध्ये आपल्या मालमत्तेची योग्य किंमत, लिलावाची वेळ आणि तारीख, रिझर्व्ह प्राईस इत्यादींचा तपशील देखील नमूद केलेला असावा. इथे हे लक्षात घ्या कि, आपल्या मालमत्तेचे अवमूल्यन होत असल्यास लोन डिफॉल्टर म्हणून आपल्याला त्याबाबत आक्षेप घेण्याचा अधिकार आहे.
उत्पन्न संतुलित करण्याचा अधिकार
आपल्या मालमत्तेची विक्री केल्यानंतर वसूल केलेल्या रकमेतून जास्त रक्कम मिळाल्यास कर्ज देणाऱ्या संस्थांकडून ती कर्जदाराला परत करावी लागेल. कारण कोणत्याही मालमत्तेचे मूल्य कधीही वाढू शकते. ज्यामुळे त्याचे मूल्य बँकेला द्यायच्या रकमेपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे लिलाव प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. Bank Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/BS_CircularIndexDisplay.aspx?Id=4330
हे पण वाचा :
Donald Trump यांनी पोर्नस्टारला पैसे दिले? नक्की काय आहे Hush Money प्रकरण
http://NMACC : 5 Star Hotel पेक्षा काही कमी नाही निता अंबानींची ‘ही’ वास्तू; प्रवेश फी केवळ Rs.199
Tips and Tricks : घरातील घाण झालेली स्विच बोर्डची बटणे फक्त 10 रुपयांर करा स्वच्छ
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..