Bank fraud साठी बँक दोषी नाही, म्हणून नुकसान भरपाईसाठी कोणतीही जबाबदारी नाही : कोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपल्या बँक खात्यातून पैसे काढल्याचा घोटाळा झाला तर अशा बँक फसवणूकी (Bank fraud) साठी बँकांना दोषी ठरवता येणार नाही. जर अशी चूक ग्राहकांमुळे (Consumer) झाली असेल तर त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी बँक जबाबदार नाही. असा आदेश गुजरातमधील अमरेली येथील ग्राहक कोर्टाने (Consumer Court of Gujarat) जारी केला आहे.

अमरेलीमध्ये ग्राहक विवाद निवारण आयोग अमरेली (Consumer Disputes Redressal Commission Amreli) ने फसवणूकीच्या पीडिताला नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. पीडिताची 41,500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कोर्टाचा असा विश्वास आहे की, त्या व्यक्तीच्या स्वत: च्या दुर्लक्षामुळे ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे याबाबत बँकेची कोणतीही जबाबदारी नाही.

NCDRC ने बँकांनाही जबाबदार धरले
आधीच्या एक प्रकरणात, राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (एनसीडीआरसी, NCDRC) म्हटले होते की, अनधिकृत व्यवहाराच्या बाबतीत बँका त्यांच्या ग्राहकांना पैसे देण्यास जबाबदार आहेत. NCDRC च्या मते, बँका त्यांच्या उत्तरदायित्वाचा चुकीचा मार्ग टाळण्यासाठी अटी आणि नियमांचे आवरण घेऊ शकत नाहीत. त्याच वेळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मते, जर एखाद्या थर्ड पार्टीच्या उल्लंघनामुळे हा व्यवहार झाला असेल आणि ग्राहक तीन दिवसांत बँकेला सूचित करत असेल तर यासाठी ग्राहक जबाबदार असणार नाही.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
सेवानिवृत्त शिक्षक कुरजी जाविया लॉ प्रॅक्टिस करतात. 2 एप्रिल 2018 रोजी एका व्यक्तीने त्यांना भेटण्यासाठी बोलाविले होते ज्याने स्वतःची स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) व्यवस्थापक म्हणून ओळख करून दिली होती. या व्यक्तीने जाविया यांच्या एटीएम कार्ड डिटेल्स मागितली. त्यांनी SBI चा व्यवस्थापक म्हणून त्याला डीटेल्सही दिल्या. दुसर्‍याच दिवशी 39,358 रुपयांची पेन्शन त्यांच्या खात्यात आली आणि त्यानंतरच कोण्या एका व्यक्तीने त्याच्या खात्यातून 41,500 रुपये काढले. त्यानंतर त्यांनी बँकेला फोनही केला पण त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर असे आढळले की, फसवणूक करणार्‍यांनी पैसे ऑनलाइन शॉपिंगमध्ये वापरले आहेत. त्यांच्या मते बँकेला याबाबतीत त्वरित कळविण्यात आले होते. बँकेने जर लगेचच कारवाई केली असती तर हे नुकसान त्यांना रोखता आले असते. त्या आधारे त्यांनी SBI विरोधात गुन्हा दाखल केला.

बँकेला का दोषी मानले गेले नाही ?
ग्राहक कोर्टाने सांगितले की, बँका ग्राहकांना त्यांचे एटीएम कार्ड डिटेल्स किंवा बँक खात्याचे डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करू नये यासाठी पुरेशी चेतावणी देतात. बँकांनी केवळ सूचना बोर्डावर मार्गदर्शक सूचना पेस्टच केली नाही तर सतर्क राहण्याचा मेसेजही दिला आहे. बँका ग्राहकांना माहिती देतात की, कोणताही बँक कर्मचारी कधीही एटीएम कार्डचे डिटेल्स विचारत नाही. कोर्टाच्या म्हणण्यानुसार याचिकाकर्ता जाविया यांनी बँकांनी ग्राहकांना जे न करण्याचा सल्ला दिला तेच केले. म्हणजे हा निष्काळजीपणा बँकेचा नव्हता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment