हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मोठ्या सरकारी बँकेपैकी एक असलेल्या Bank of Baroda ने आपल्या चेक पेमेंट नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, बँकेकडून ग्राहकांना आतापासूनच त्या संबंधित माहिती देण्यास सुरुवात केली गेली आहे.
Bank of Baroda ने एका ट्विटद्वारे माहिती शेअर केली आहे. यावेळी बँकेने म्हटले की,” 1 ऑगस्टपासून चेक पेमेंटचे नियम बदलतील.” RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून बँक ऑफ बडोदाने चेक पेमेंट नियम बदलले आहेत. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की,” 1 ऑगस्टपासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम बंधनकारक करण्यात आली आहे. त्याशिवाय चेक पास केला जाणार नाही.
पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे काय ???
मध्यंतरी चेकशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. ज्यामुळे RBI कडून बँकांना हा नियम लागू करण्यास सांगितले गेले. या नियमानुसार, जर 5 लाखांपेक्षा जास्त रकमेचा चेक असेल तर त्यावर प्रक्रिया होण्यापूर्वी आपल्याला चेक बाबत पुन्हा एकदा खात्री करावी लागेल. Bank of Baroda
म्हणजेच यामध्ये चेक जारी करणार्याला चेक नंबर, चेकची तारीख, पेमेंट करणार्या व्यक्तीचे नाव, प्राप्तकर्त्याचा खाते क्रमांक आणि रक्कम यांसारखे तपशील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बँकेला द्यावे लागतील.
2 लाखांच्या चेकसाठी 1 जुलैपासून लागू
याआधी Bank of Baroda कडून 2 लाख आणि त्याहून जास्त रकमेच्या चेकसाठी हा नियम 1 जुलैपासून लागू करण्यात आला होता. म्हणजे जर चेकमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम भरली तर त्यासाठी पुन्हा खात्री करावी लागेल. आता हा नियम 5 लाखांवरील रकमेसाठी देखील लागू होणार आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/
हे पण वाचा :
PM Kisan योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का ???
Cyber Froud : ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत, कसे ते जाणून घ्या
Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!
Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!