हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : गेल्या आठवड्यात RBI कडून रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. Bank of Baroda कडून आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देण्यात आला आहे. बँकेकडून विविध मुदतीच्या कर्जासाठीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हे नवीन दर 12 ऑगस्टपासून लागू होतील
Bank of Baroda ने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, त्यांनी MCLR च्या दरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. हे नवे दर 12 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आता एक वर्षाचा बेंचमार्क MCLR 7.65 टक्क्यांवरून 7.70 टक्के करण्यात आला आहे. बहुतेक ग्राहक कर्जांवरील व्याजदर याच आधारावर निश्चित केले जातात.
आता एक महिन्याच्या मुदतीच्या कर्जासाठीचा MCLR 0.20 टक्क्यांनी वाढवून 7.40 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठीचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 7.45 आणि 7.55 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Bank of Baroda
अशा प्रकारे EMI वाढणार
MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI मध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. बहुतेक कन्झ्युमर लोन मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महाग होऊ शकते. Bank of Baroda
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/retail-loans-interest-rates
हे पण वाचा :
EPFO: जर नियोक्ता तुमच्या PF खात्यात पैसे टाकत नसेल तर काय करावे ???
RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द !!!
Samsung Galaxy Z Fold 4 : Samsung ने लॉन्च केला 2 डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत
Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा