Samsung Galaxy Z Fold 4 : Samsung ने लॉन्च केला 2 डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंग मोबाईलचे (Samsung Galaxy Z Fold 4) चाहते असलेल्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच आपला फ्लॅगशिप Galaxy Z Fold 4 लॉन्च केला आहे.सॅमसंगने आपला हा स्मार्टफोन पूर्वीपेक्षा हलका बनवला असून मोबाईलच्या मल्टीटास्किंगवर विशेष लक्ष दिले आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव मध्ये जाणून घेऊया या मोबाईल बाबतच्या काही खास गोष्टी …

मोबाईलला दोन डिस्प्ले-

सॅमसंगचा हा स्मार्टफोन (Samsung Galaxy Z Fold 4) दोन डिस्प्लेसह येतो. याची मुख्य स्क्रीन ६.७ इंच AMOLED डिस्प्लेची आहे, जी Full HD+ रिझॉल्यूशन आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येते. तर कव्हर स्क्रीनमध्ये १.९ इंच Super AMOLED डिस्प्ले दिला आहे. मोबाईलच्या डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस सपोर्ट आहे. मोबाईलच्या तळाशी स्पीकर आणि चार्जिंग साठी टाइप- सी पोर्ट आहे. उजवीकडे पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटणे आहेत, तर डाव्या बाजूला सिम कार्ड ट्रे आहे.

Samsung Galaxy Z Fold 4

 4400mAh बॅटरी- (Samsung Galaxy Z Fold 4)

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. यात 4400mAh बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. सोबत वायरलेस चार्जिंग देखील आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy Z Fold 4 12GB RAM + 256GB स्टोरेज ऑप्शन, 12GB RAM + 512GB स्टोरेज ऑप्शन आणि 12GB RAM + 1TB स्टोरेज ऑप्शन मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Samsung ने लॉन्च केला २ डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत

 

दमदार कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेरा बाबत बोलायचं झालं तर या (Samsung Galaxy Z Fold 4) स्मार्टफोन मध्ये 3 बॅक कॅमेरे आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा, आणि १० मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी फ्रंटला 10 मेगापिक्सेल आणि 4 मेगापिक्सेलचा चे असे २ कॅमेरे आहेत.

Samsung Galaxy Z Fold 4

किंमत-

या सॅमसंग स्मार्टफोनची किंमत इतर मार्केटमध्ये $1,799 म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1,42,700 रुपये असू शकते. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 Beige, Graygreen, Phantom Black या कलर मध्ये उपलब्ध असेल.

हे पण वाचा : 

Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? अशा पद्धतीने करा चेक

OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज

Moto G62 5G : 5000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा; Motorola च्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा

iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स

Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही