हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of India मध्ये खाते असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 01.10.2022 पासून हे नवीन दर लागू होतील असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी RBI ने रेपो दर 50 बेस पॉईंट्सने वाढवून तो 5.90% वर आणला आहे. ज्यानंतर Bank Of India ने FD वरील व्याजदर वाढवल्याची घोषणा केली आहे.
गेल्या काही वर्षांत FD वरील व्याजदर लक्षणीयरीत्या कमी झाले होते. मात्र, आता त्यामध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आता Bank Of India कडून सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) 2.85% ते 5.75% पर्यंत व्याजदर दिले जाईल. याशिवाय, 555 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 6.05% व्याज दर मिळेल.
अशा प्रकारे असतील नवीन व्याजदर
7 ते 45 दिवसांसाठी 2.85%
45 ते 179 दिवस 3.85%
180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.35%
1 वर्ष ते 554 दिवस 5.50%
555 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 6.05%
556 दिवस ते 3 वर्षे 5.50%
3 ते 5 वर्षे 6.00%
5 ते 10 वर्षे 5.75%
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दर पहा
Bank Of India वरील माहिती नुसार, बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रिटेल टर्म डिपॉझिट्स वर 25 बेस पॉईंट्स अतिरिक्त प्रीमियम (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) 3 वर्षे आणि त्यावरील सर्व कालावधीसाठी सध्याच्या 50 बेस पॉईंट्स व्यतिरिक्त दिले जाईल. मात्र ज्येष्ठ नागरिक/कर्मचारी/माजी-कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या अतिरिक्त दराचा लाभ घेण्यासाठी डिपॉझिट्सचा कालावधी 6 महिने आणि त्याहून जास्त असावा.
Bank Of India ने वरील माहिती नुसार, ज्येष्ठ नागरिक / ज्येष्ठ नागरिक कर्मचारी / माजी कर्मचारी हे पहिले खातेदार असावेत. तसेच FD जमा करताना त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावे. हे लक्षात घ्या कि, देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI कडून गेल्या 4 महिन्यांत रेपो दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे रेपो रेट 4.00% वरून 5.40% वर आला आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofindia.co.in/RupeeTermDeposit
हे पण वाचा :
Stock Market : जागतिक बाजार अन् परदेशी गुंतवणूकदारांसह ‘हे’ घटक ठरवणार शेअर बाजाराची दिशा
Gold Price : सोने-चांदी महागले, या आठवड्यात सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! होम-कार लोन महागले