Bank Of India | आपले स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाच्या ड्रीम लिस्टमधील एक मोठे स्वप्न असते. तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक अहोरात्र प्रयत्न करत असतात. परंतु अनेकांना एक हाती हे घर घेता येत नाही. त्यामुळेच लोक बँकेकडून गृहकर्ज घेतात. या कर्जाचा व्याजदर देखील अधिक असतो. परंतु आता गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) नुकतेच नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजाचे दर हे 8.45 टक्क्यांवरून 8.3% पर्यंत कमी करत असल्याची घोषणा केलेली आहे. 31 मार्चच्या मर्यादित कालावधीसाठी हा व्याजदर लागू केलेला आहे. त्यासाठी बँकेने प्रक्रिया शुल्क देखील काहीही ठेवलेले नाही. त्यामुळे आता ज्यांना नव्याने घरी घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली बातमी आहे.
8.3 हा घराचा कर्जाचा अत्यंत कमी व्याजदर असल्याचे बँक ऑफ इंडियाने सांगितलेले आहे. एचडीएफसी बँकेने देखील 8.4% व्याजदरापासून सुरू होणारी गृहकर्ज योजना आणलेली आहे. या बँकेचेही सवलतीचे दर हे 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहेत.
बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) नुकतेच 8.3% दराने गृहकर्ज जाहीर केलेले आहे. हे गृहकर्ज जर तुम्ही 30 वर्षाच्या मुदतीसाठी घेतले तर कर्जदाराला दर महिन्याला हप्ता हा एका लाखामागे 750 रुपये एवढा असणार आहे. त्याचप्रमाणे बँकेने ओव्हरट्राफ्ट सुविधेसह कर्जाची व्याप्ती वाढवलेली देखील आहे. त्याचप्रमाणे अक्षय्य ऊर्जा पर्यायांच्या वापरांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने छतावरील सौर यंत्रणेसाठी 7 टक्के व्याजदर आणले आहे. यासाठी बँकेकडून 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. यासाठी बँके कडून 120 महिन्यांच्या परतफेडीचा कालावधी दिला जातो. त्याचप्रमाणे प्रकल्प खर्चाच्या 95% पर्यंत वित्त पुरवठा देखील केला जातो.