हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेली ऑटो इंडस्ट्री आता त्यातून बाहेर पडत आहेत. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेत उत्कृष्ट आणि उच्च दर्जाच्याचे फीचर्स असलेल्या अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. अशातच सणासुदीचा हंगाम देखील जवळ आला आहे. यामध्ये बहुतेक लोकांकडून नवीन कारची खरेदी केली जाते.
जर आपण देखील नवीन कार खरेदी करण्याविचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. यासाठीची सर्वात पहिली पायरी म्हणजे कार निवडणे. तसेच कार खरेदी करण्यापूर्वी वाहनांच्या किंमतींची तुलना करणे केव्हाही चांगले. याबरोबरच आपले बजेट आणि वापरानुसार वाहन खरेदी करणे महत्त्वाचे ठरेल. कार खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत त्याची माहिती खाली देण्यात आली आहे. Car Loan
10-15% डाउन पेमेंट करा
कारची निवड झाल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे फायनान्स. यासाठी आपल्याला बँकेकडून कार लोन घेता येऊ शकेल. मात्र हे लक्षात घ्या कि, कार लोन घेताना आपल्याला 10-15% डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर उरलेले पैसे बँकेतून घेता येतील. Car Loan
कर्ज घेताना कोणतीही सिक्योरिटी दिली जाणार नाही
अनेक लोकांकडून बँकेकडून लोन घेऊनच कार खरेदी केली जाते. कारण यासाठी अर्ज करणे आणि ते मिळवणे देखील सोपे आहे. तसेच याचा व्याजदर देखील कमी असतो. त्याचबरोबर कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना देखील सहजपणे कार लोन घेता येते, कारण ते सुरक्षित लोन आहे. यामध्ये आपले वाहन हेच सिक्योरिटी म्हणून राहते. त्यामुळे हे कर्ज घेताना आपल्याला इतर कोणतीही सिक्योरिटी देण्याची गरज नसते. Car Loan
त्यामुळे द्यावे लागते जास्त व्याज
जेव्हा आपण कार लोन घेतो तेव्हा आपले वाहन बँकेकडे तारण म्हणून ठेवले जाते. यानंतर सर्व पेमेंट दिल्यानंतरच बँकेकडून आपल्याला कारची संपूर्ण मालकी दिली जाते. कार लोन घेताना व्याजदर हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण त्याद्वारे वाहनाची एकूण किंमत ठरवली जाते. इथे हे लक्षात ठेवा कि, कार लोनची रक्कम जितकी जास्त असेल तितका तुमचा EMI जास्त असेल. त्याचप्रमाणे, जर कमी कालावधीसाठी कर्ज घेतले तर EMI देखील जास्त असेल. तसेच जर दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेतल्यास EMI कमी होऊ शकेल, मात्र यामध्ये एकूण व्याज जास्त असेल. Car Loan
खाली काही बँकांच्या Car Loan च्या व्याजदरांबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
बँकेचे नाव व्याजदर (वार्षिक)
स्टेट बँक ऑफ इंडिया 7.20% पासून सुरू
कॅनरा बँक 7.30% पासून सुरू
HDFC बँक 7.95% पासून सुरू
IDBI बँक 7.35% पासून सुरू
पंजाब नॅशनल बँक 6.65% पासून सुरू
युनियन बँक ऑफ इंडिया 7.40% पासून सुरू
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/car-loan.html
हे पण वाचा :
Changes from 1 August : ऑगस्ट महिन्यात होणार ‘हे’ 5 महत्त्वाचे आर्थिक बदल !!!
ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका
Car Loan : सेकंड हँड कार घेण्यासाठी अशाप्रकारे स्वस्त दरात मिळवा कर्ज !!!
DBS Bank कडून ग्राहकांना मोठी भेट !!! FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये कमी खर्चात मिळवा जास्त फायदे !!!