UPI, डिजीटल पेमंट संबंधी तक्रार निवारणासाठी RBI सरसावले; सुरु करणार ‘ही’ योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । युपीआय डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांना येणाऱ्या अडचणीच्या तक्रार निवारणासाठी भारतीय रिझर्व्ह बँक धोरण आखण्याचा विचारात आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरबीआय 2021 मध्ये NBFC तसंच डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मसाठी ‘लोकपाल योजना’ आणणार आहे, यासंबंधीची घोषणा शक्तीकांत दास यांनी केली आहे. ग्राहकांच्या अडचणींचं तथा समस्येचं निवारण लगोलग व्हावं, यासाठी ही घोषणा केली गेली आहे.

त्यानुसार आयरबीआय लवकरच ग्राहकांच्या तक्रारींसाठी ऑनलाईन बेससाईट पोर्टल उपलब्ध करून देणार आहे. या पोर्टलवर बँक तसंच वित्तीय कंपन्या यांच्यासंबंधी समस्येचं निराकरण ऑनलाईन करता येणार आहे. तक्रार करतावेळी आपल्याला बँकेची पूर्ण माहिती द्यावी लागेल तसंच नाव, पत्ता, मोबाईल नंबर द्यावा लागेल.याशिवाय आरबीआयने सर्व डिजिटल ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्मवरील तक्रारी दूर करण्यासाठी 24 ×7 हेल्पलाईन सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अशाप्रकारची हेल्पलाईन सुरु केल्यास ग्राहकांना डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर चांगली सेवा मिळेल, अशी आरबीआयला आशा आहे.

याचबरोबर ग्राहकांचा विश्वासही वाढेल. ही वेबसाईट आर्थिक आणि मानव संसाधन या दोन्हीवरची असलेला खर्च कमी करेल. तक्रारींसाठी याआधीच सीएमएस पोर्टल आहे. परंतु नवीन पोर्टलचा थेट ग्राहकांना फायदा होईल. बँका, एनबीएफसी आणि बिगर बॅंकांच्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सचे ग्राहक लवकरच केंद्रीय पोर्टलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.