PhonePe आणि Google Pay वापरकर्त्यांना मोठा फटका! बँका करणार हे सर्व UPI ID बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच UPI आयडीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच, सर्व बँका PhonePe आणि Google Pay सारखे इतर ॲप्सवरील UPI आयडी बंद करणार आहे. ज्या वापरकर्त्यांनी गेल्या एका वर्षापासून या ॲप्सवरून कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नाहीत असे सर्व ID ब्लॉक करण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सर्व बँकांना आणि थर्ड पार्टी ॲप्सला दिले आहेत. यासाठी NPCI ने बँकांना 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

सध्या PhonePe आणि Google Pay अशा थर्ड पार्टी ॲप्सवर अनेक असे आयडी आहेत ज्यावरून बऱ्याच काळापासून कोणतेही व्यवहार करण्यात आलेले नाही. त्यामुळे असे आयडी बंद करण्याचे निर्देश NPCI कडून देण्यात आले आहेत. यासाठी NPCI ने 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देखील दिली आहे. महत्वाचे म्हणजे, UPI आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी बँक वापरकर्त्यांना ईमेल किंवा मेसेजद्वारे सूचना पाठवेल. ज्यामुळे लक्षात येईल की तुमचे UPI आयडी बंद करण्यात येत आहे.

NPCI ने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक चुकीचे व्यवहार होण्यास आळा बसणार आहे. तसेच, अनेक निष्क्रिय आयडी बंद पडणार आहे. या आयडीवरून नवीन वर्षापासून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. दरम्यान, NPCI ने दिलेल्या निर्देशानुसार, सर्व बँका संबंधित मोबाईल नंबरचे व्हेरिफिकेशन करतील. यानंतर जे आयडी एका वर्षापासून वापरण्यात आलेले नाहीत ते बंद करून टाकतील. यानंतर हे आयडी पुन्हा वापरता येणार नाही. तसेच, यामुळे कोणतेही गैरव्यवहार होणार नाही.