सोलापूर | नीरा देवधर बरोबरच आता उजनीचं पाणी चोरण्याचा डाव बारामती आणि इंदापूरकरांनी आखला आहे, पण त्यांचा हा डाव उधळवून लावू असा इशारा माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दिला.
उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे.या निर्णयावरुन सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. उजनीतून इंदापूरला पाणी देण्यारुन सरकार विरुध्द शेतकरी असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या या निर्णया विरोधात विविध शेतकरी संघटनांबरोबरच आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे.
खा. रणजिंतसिंह निंबाळकर म्हणाले, आम्ही केवळ निषेधच करणार नाही. तर जनतेमध्ये उठाव करण्याचा प्रयत्न भाजपा करेल. कोर्टामध्ये स्पेशल लिव अपलिकेश निश्चित जाणार आहे. असे म्हणत, आता भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही उडी घेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूलचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाना साधला आहे.