महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास कारवाई; बोम्मईंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सध्या सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई उद्या बेळगावला जाणार आहेत. तत्पूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल असं त्यांनी म्हंटल आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे. तुमच्या आक्षेपांवरचा वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्यामुळे तेथेच लढू .. सध्या वातावरण बरोबर नाही त्यामुळे ते जर कर्नाटकात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो. तरीही महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना बोम्मई यांनी कर्नाटक पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादात ठिणगी पडली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्री कर्नाटकात जाणार की नाही याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं फडणवीस यांनी म्हंटल आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जरी येऊ नका असे म्हंटले असले तरी आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणीही घाबरत देखील नाही. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन असल्याने काय करावं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील,असे फडणवीस यांनी म्हंटले.