रावसाहेब दानवेंवर छ. उदयनराजेंचा हल्लाबोल : अशा लोकांना वेळीच ठेचलं पाहिजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
ज्या महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले त्याना कोण काय- काय म्हणत. त्याच्यावर जे कोणी बोलले, त्यावेळी लोकांनी केवळ प्रतिक्रिया दिल्या. खरंतर त्यांना त्यावेळी लोकांनी ठेचलं पाहिजे होत, असा जोरदार हल्लाबोल खा. छ. उदयनराजे भोसले यांनी मंत्री रावसाहेब दानवेंवर यांच्यावर केला आहे. या विधानामुळे भाजपला उदयनराजेंकडून घरचा दिला आहे.

खा. उदयनराजे म्हणाले, आज लोकांची नितिमत्ता बदलत असेल तर देशाचे भविष्य उज्वल असेल असे वाटत नाही. ज्या महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले त्याना कोण काय म्हणत. त्याच्यावर जे कोणी बोलले त्यावेळी लोकांनी केवळ प्रतिक्रिया दिल्या. खरंतर त्यांना त्यावेळी लोकांनी ठेचलं नाही. त्यामुळे शिवरायांचा अपमान करणे अंगवळणी पडत गेला.

महाराजांचा सन्मान करता येत नसेल तर नाव घेवू नका
छत्रपती शिवाजी राजे बोलता बोलता एकेरी उल्लेख होत आहे. आज शिवाजी बोलले उद्या ही नालायक लोक शिवज्या, शिव्या असे बोलायला कमी करणार नाही. तेव्हा छ. शिवाजी महाराजांचा सन्मान करता येत नसेल तर त्यांचे नाव घेवू नका. त्याच्यामुळे आज मोकळा श्वास घेत आहात. महाराजांच्याकडे रायगडावर जायचे म्हणजे जल्लोषात जायचे. परंतु अशापध्दतीने जायचं.