प्रत्येक पॅकेजसाठी ‘RBI’ची दारं ठोठावू नका! नाहीतर..; ‘या’ अर्थतज्ज्ञानं दिला मोदी सरकारला गंभीर इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । प्रत्येक आर्थिक संकटावेळी जर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या दाराशी गेलात तर तुम्ही बँकेला खिळखिळी कराल. यामुळे आधीच रडतखडत सुरु असलेली गुंतवणूक आणि विकासदराची गाडी आणखी खाली घसरेल, असा इशारा वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचा जास्तीत जास्त भार केवळ सरकारने स्वतःच्या खांद्यावर घेतला पाहिजे. त्याकरिता रिझर्व्ह बँकेच्या मदतीवर अवलंबून राहू नये, असा सल्ला वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केंद्राला दिला आहे. ते ‘बेनेट युनिव्हर्सिटी’ने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलत होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी आर्थिक पॅकेजची गरज आहे. बुधवारी सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र ही केवळ निम्मी मदत आहे. जी घोषणा केली आहे ही गरजेपेक्षा निम्मी आहे. यातील मोठा हिस्सा रिझर्व्ह बँकेवर अवलंबून आहे. सरकारने आता पुढे यायला हवं असे बसू यांनी सांगितले. याचबरोबर आर्थिक पॅकेजमधील छोटा हिस्सा रिझर्व्ह बँकेकडून घेण्यास हरकत नाही. ‘आरबीआय’ला अतिरिक्त चलन छपाई करून ही मदत घेता येऊ शकते. मात्र यामुळे महागाईचा भडका उडू शकतो. रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात रुपयाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक संकटात मदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जाणे योग्य नाही. यामुळे बँकेचा ढाचा खिळखिळा होईल, असा गंभीर इशाराही बसू यांनी यावेळी केंद्राला दिला.अद्याप सरकारने वित्तीय तूट नियंत्रणाबाबत ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. बाजारात रोकड तरलता उपलब्ध झाली असली तरी यामुळे महागाई वाढेल, असे बसू यांनी म्हटलं आहे. सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकारने आता विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, असे बसू यांनी सांगितले.

कोण आहेत कौशिक बसू
वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ असलेले कौशिक बसू २००९ ते २०१२ या काळात केंद्र सरकारने आर्थिक सल्लागार होते. सध्या ते कॉर्नेल युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

Untitled design - 2020-05-15T160959.811

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment