हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याना कोरोनाची लागण झाली असून त्यांना कोलकाता येथील वुडलैंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सौरव गांगुली यांना दुसर्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे.
सोमवारी रात्री सौरव गांगुली यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे गांगुली ने कोरोनाच्या दोन्ही लसी घेऊन देखील त्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे
यापूर्वी, जानेवारी 2021 मध्ये सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला काही दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर सौरव गांगुलीला महिन्यातून दोनदा अँजिओप्लास्टी करावी लागली. मात्र, त्यानंतर तो बरा झाला होता. दरम्यान, सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली.