IPL चे सर्वच सामने अनिश्चित काळासाठी स्थगित? BCCI ने हायकोर्टात दिली ‘ही’ माहिती

नवी दिल्ली : देशातील वाढती कोरोनारुग्णसंख्या विचारात घेऊन मंगळवारी आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने घेतला. मात्र सर्वच सामने स्थगित करत आहोत याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिले न्हवते. उर्वरित आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआय आज दिल्ली हायकोर्टाला दिली.

आयपीएल सामान्यांमधील अनेक खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर मंगळवारी बीसीसीआयने सामने स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता सर्वच सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचे बीसीसीआय ने म्हटले आहे. उर्वरित आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्ली हायकोर्टाला दिली.

दरम्यान, जनतेच्या आरोग्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य का दिले जात आहे याची चौकशी करण्याची मागणी करणार्‍या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे निवेदन आले. आयपीएलचे सामने होणार का? सामन्यांवरील स्थगिती केव्हा उठणार याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

You might also like