अखेर ‘दादा’ ठणठणीत ; सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयातून (Woodlands Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर गांगुलीची तब्बेत सुधारल्यानंतर सहा दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एनएआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. मी पूर्णपणे ठणठणीत आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. तसेच माझ्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केलीत, मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया सौरव गांगुलीने डिस्चार्जनंतर दिली.

गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला वर्कआऊट करताना डोळ्यांसमोर अंधारी आली. यानंतर त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशभरातुन गांगुली यांच्या प्रकृती साठी प्रार्थना करण्यात येत होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाउन गांगुलीच्या तब्बेतीची चौकशी केली होती तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गांगुलीच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment