राहुल गांधी फिनिक्सप्रमाणे भरारी घेतील ; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास त्यांचा देशातील विरोधी पक्षांना फायदाच होणार आहे.काँग्रेस पक्ष आजही देशातील मजबुत विरोधी पक्ष आहे. प्रत्येक गावागावात पोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोठं आहे. त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे एक देशातील मोठं पद आहे. आणि राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

प्रत्येक घराण्याच्या नावाने पक्ष चालत असतो. गांधी आडनावाने जसा काँग्रेस पक्ष चालतो तसेच ठाकरे आडनावाने शिवसेना चालते. प्रत्येक घराणं हा त्या पक्षाचा चेहरा असतो, असं सांगतानाच गांधी कुटुंबाने देशाचं नेतृत्व करावं अशी जर जनतेची भावना असेल तर त्याचा सन्मान राखला पाहिजे. हीच खरी लोकशाही आहे, असं राऊत म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अपशब्दात टीका करणं चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही, असा टोला लगावतानाच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

यावेळी त्यांनी ईडी कारवाई वरून केंद्र सरकार वर निशाणा साधला. विरोधकांना त्रास देण्यासाठीच तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला जात आहे. केवळ त्रास देण्यासाठीच या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like