औरंगाबाद – वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला सह व्हायरल फीव्हरचे रुग्ण सध्या शहरात वाढत आहेत. शासकीय रुग्णालयात खाजगी रुग्णालय देखील फुल होत आहेत. काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने व्हायरल फीव्हर ने त्रस्त रुग्णांची वाढ होत असून यातच जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची डोके वर काढले आहे. मागील दोनच दिवसात डेंग्यूच्या 27 रुग्णांची भर पडली असल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाचे प्रमाण सध्या कमी होत असलेले तरी इतर आजारांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. डेंग्यू, मलेरिया आदींची लक्षणे असलेले रुग्ण वाढत आहेत. कधी ऊन तर कधी गारवा अन कधी पाऊस अशा वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असे आजार होत आहेत. शिवाय पावसामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया सारख्या साथीच्या आजारांनी देखील थैमान घातले आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
शासकीय यंत्रणेतील नोंदीनुसार सप्टेंबरमध्ये 77 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. यात मनपा हद्दीतील 65 रुग्णांचा समावेश आहे. तसेच खासगी रुग्णालयात निधन झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या 28 आहे. गेल्या 22 दिवसांमध्ये तब्बल 105 रुग्ण आढळले आहेत. मनपाच्या मलेरिया विभागातर्फे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.