नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत आपण हवामान बदलाच्या गोष्टींबद्दल ऐकले असेल मात्र अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना बीचवर (beach) याचा प्रत्यय आला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना बीचवर एक बीच (beach) हाऊस समुद्राच्या लाटांनी कशा प्रकारे उद्ध्वस्त केले याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून ते किती भयंकर आहे याचा प्रत्यय येईल. अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Cape Hatteras National Seashore (Seashore) has confirmed that an unoccupied house at 24265 Ocean Drive, Rodanthe, N.C. collapsed this afternoon. This is the second unoccupied house collapse of the day at the Seashore. Read more: https://t.co/ZPUiklQAWA pic.twitter.com/OMoPNCpbzk
— Cape Hatteras National Seashore (@CapeHatterasNPS) May 10, 2022
10 मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे घर पडताना दिसत आहे. घराचा खालचा भाग उखडून गेल्यानंतर लाटांसोबत हे घर वाहून जाताना दिसत आहे. हे घर रिकामं होतं आणि एका बेटाच्या बाहेरील किनाऱ्यावर बांधलं गेलं होतं. हे घर काही क्षणातच लाटांसोबत वाहून गेलं.
यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकार्यांनी सांगितले कि, एकाच दिवसात अशाप्रकारे लाटांसोबत वाहून जाणारं हे दुसरं बीच (beach) हाउस आहे. घर कोसळण्याच्या काही सेकंद आधीच व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असून लाटांमुळे घर पडल्याची घटना स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेत जे घर उद्ध्वस्त झालं, त्याची किंमत सुमारे 2 कोटी 92 लाख रुपये आहे.
हे पण वाचा :
ICICI Bank कडून FD च्या व्याजदरात वाढ !!!
Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोनवरील व्याजदरात वाढ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढविली; आता ‘या’ दर्जाची पुरवली जाणार सुरक्षा
आमिरच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पडद्यामागे नव्हे तर पडद्यावर झळकणार ‘जुनैद’