व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढविली; आता ‘या’ दर्जाची पुरवली जाणार सुरक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यानंतर त्यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यावरून मनसे नेत्यांकडून राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर लक्षात ठेवा, असा इशारा ठाकरे सरकारला देण्यात आला होता. दरम्यान राज यांना येणाऱ्या धमक्यांवरून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय आज ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्याकडून मनसेच्या औरंगाबादच्या जाहीर सभेत 5 जूनला अयोध्येत जाण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या अयोध्याच्या दौऱ्याला विरोधही होऊ लागला असताना त्यांना एक उर्दू भाषेत धमकीचे पत्र आल्यामुळे एकच खळबळ उडाली. यावरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची भेट घेत त्यांच्याकडे याबाबत माहिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचा निर्णय घेतला.

राज ठाकरे यांच्याकडे पूर्वीपासून वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दौऱ्या दरम्यानही त्यांच्या सुरक्षेची पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे.

राज ठाकरे यांना जीवे मारण्याचे पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र काही दिवसांपूर्वी आले होते. राज यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा बाळा नांदगावकरांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती.

राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर… : बाळा नांदगावकर

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट इशाराच दिला. यावेळी ते म्हणाले की, पत्र कोणी दिले आहे याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आले आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. आता ह्मविकास आघाडीला माझा थेट इशारा आहे. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, असे नांदगावकर यांनी म्हंटले.