Sunday, February 5, 2023

भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थी करणाऱ्या सहकाऱ्याला मारहाण

- Advertisement -

औरंगाबाद : सहका-याला शिवीगाळ आणि मारहाण करणा-या दोघांना समजावून सांगण्यासाठी जाणाऱ्या कामगाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना 9 जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास कांचनवाडी येथील एल अँड टी कंपनीच्या कार्यालयासमोर घडली होती.

चेतन ऋषी दांडेकर (23) असे या तरुणाचे नाव असून साई सृष्टी पार्क गोलवाडी शिवार येथे तो राहत होता. चेतनचा सहकारी अरुण पांडेय याला एल अँड टी कंपनीतील वाहनाचा चालक शिवीगाळ आणि मारहाण करत होता.

- Advertisement -

त्यावेळी माझ्या सहका-याला मारहाण करु नको, असे म्हणताच त्याने सहकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावरुन सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.