नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी ‘व्हाइट हाऊस’च्या ट्विटर हँडलवरून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसह ६ भारतीय ट्विटर अकाउंट्सना अचानक अनफॉलो केलं. काहीच दिवसांपूर्वी व्हाइट हाऊसने पंतप्रधान मोदींना ट्विटवर फॉलो केल्यांनतर भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाल्याचे भारतात म्हटलं जात होत. व्हाइट हाऊसच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदी हे एकमेव राजकीय नेते होते. परंतु, व्हाइट हाऊसने त्यांना अचानक अनफॉलो केल्यांनतर भारतातून नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही व्हाइट हाऊसच्या कृतीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना व्हाइट हाउसनं अनफॉलो केल्यामुळे मी खूप निराश झालोय. परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. दरम्यान, अचानक पंतप्रधान मोदींना अचानक अनफॉलो करण्याचा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भात व्हाइट हाऊसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
I’m dismayed by the “unfollowing” of our President & PM by the White House. I urge the Ministry of External Affairs to take note.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 29, 2020
व्हाइट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनं नाव न सांगण्याच्या अटींवर ‘पीटीआय’ला यासंदर्भात आता माहिती दिली. “व्हाइट हाऊसचे ट्विटर हँडल अमेरिकनं सरकारच्या इतर ट्विटर हँडलचं अनुकरणं करते आणि त्यानुसारच काम केलं जातं. उदारणार्थ राष्ट्रध्यक्षांचा एखाद्या देशात दौरा असेल, तर त्या दौऱ्यापूर्वी यजमान देशातील महत्त्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो केलं जातं. कारण दौऱ्याविषयीचे यजमान देशाच्या अधिकृत ट्विटर हँडल करण्यात आलेले ट्विट रिट्विट केले जातात. त्यानंतर पुन्हा अनफॉलो केलं जातं. केवळ दौऱ्यादरम्यान मर्यादित कालावधीसाठी असं केलं जातं,” असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारीतील नियोजित भारत दौऱ्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे ट्विटर हँडल, अमेरिकेच्या भारतातील दूतावासाचे ट्विटर हँडल आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांचं ट्विटर हँडल फॉलो केलं होतं. २९ एप्रिल रोजी अनफॉलो करण्यात आलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.