औरंगाबाद – आम्ही पोलिस आहोत, तुम्ही अंगावर एवढे सोने कशाला घातले? ते काढून खिशात ठेवा, असे सांगत सेवानिवृत्त शिक्षकांचा दोन अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन असा 2 लाख 25 हजारांचा ऐवज लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शिवानिवृत्त शिक्षक सुधाकर गोपीनाथ इंजे पाटील (73, रा. शिवाजीनगर) हे गुरुवारी दुपारी फळे आणण्यासाठी शिवाजीनगर चौकात पायी चालत जात होते. दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलिस आहोत, तुम्ही गळ्यात आणि हातात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने कशाला घालता त्यामुळे सोने काढून ठेवा. काढून घेतले नाही तर आम्ही तुम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन जातो असे धमकावले.
यानंतर इंजे पाटील यांनी बोटातील 16 ग्राम सोन्याच्या दोन अंगठ्या आणि गळ्यातील 29 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बाहेर काढून किशात ठेवताना दोन भामट्यांनी लंपास केली.