बीड : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीनिमित्त रविवारी राज्यभरातील भाविकांनी विठ्ठलाची पूजा केली. उपवास करून एकादशी साजरी केली. यादरम्यान बीडमधल्या एका गावात उपवासासाठी केलेल्या फराळातून अनेकांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. भगरीपासून तयार केलेल्या दशम्या खाल्ल्याने एकाच गावातील तब्बल 70 जणांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आषाढी एकादशीनिमित्त गावात उपवासासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणावर भगरीच्या दशम्याही तयार करण्यात आल्या होत्या. या दशम्या खाल्ल्यानंतर अनेक जणांना उलटी, चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला.
काय घडले नेमके ?
रविवारी आषाढी एकादशीनिमित्त गावातील बहुतांश जणांना उपवास होता. त्यामुळे वडवणी तालुक्यात कवडगाव येथे गावकऱ्यांनी एकत्रितपणे भगरीच्या दशम्या केल्या होत्या. मात्र त्या खाल्ल्यामुळे अनेकांना उलटी, चक्कर येणे आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. कवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत काही जणांवर उपयाच सुरु करण्यात आले. तर काही जणांना आरोग्य उपकेंद्र आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कवडगावचे सरपंच संदिपान खळगे यांनी दिली आहे.
भगरीवर बुरशी तयार झाली?
भगरीच्या दशम्या खाल्ल्याने विषबाधा (Poisoning) झाल्याचा प्रकार घडल्यामुळे कवडगाव येथे नागरिकांमध्ये खळबळ माजली होती. अनेक दिवसांची पॅकिंग असलेल्या भगरीत बुरशी तयार होते. ही बुरशी म्हणजे एक प्रकारचे विषच असते. ते पोटात गेल्याने कवडगाव येथील नागरिकांना एकाच वेळी फराळातून विषबाधा (Poisoning) झाल्याचे दिसले. गावातील रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती खासगी डॉ. शंकर वाघ यांनी दिली आहे.
रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना जास्त त्रास
भगरीच्या दशम्या खाल्ल्याने काहींना त्रास झाला तर काहींना झाला नाही. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती, त्यांना या प्रकाराचा त्रास झाला. तर ज्यांची प्रतिकारक शक्ती चांगली होती, त्यांना विषबाधा (Poisoning) झाली नाही.
हे पण वाचा :
लग्नास प्रतिसाद देत नसल्याने 17 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील दौंडमधील घटना
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!
Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले संघाचे कर्णधारपद