हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी गुरुवारी सांगितले की कोरोना विषाणूबाबत त्यांच्या देशातील बहुतांश भागात लागू करण्यात आलेली आणीबाणी मागे घेण्यात आली आहे. मात्र, राजधानी टोकियो आणि ओसाकामध्ये ही आणीबाणी कायम राहील. पंतप्रधान अॅबे यांनी म्हटले आहे की आजपासून नवीन जीवनाची सुरुवात होते आहे आणि पुढील काही दिवसात सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
आशा आहे की आता सर्व काही ठीक आहे
जपानचे पंतप्रधान अॅबे यांनी टीव्हीवरून देशाला संबोधित केले आणि या आणीबाणी बाबत घोषणा केली. ते म्हणाले, “आज आम्ही निर्णय घेतला आहे की ४७ पैकी ३९ प्रांतात लागू असलेली आणीबाणी मागे घेत आहोत.” टोकियो व्यतिरिक्त ओसाका, क्योतो आणि होक्काइडो यासह इतर सात प्रांतांमध्ये मात्र ही आणीबाणीची परिस्थिती कायम राहील. हे प्रांत सध्या जास्त जोखमीच्या ठिकाणी आहेत. ७ एप्रिल मध्ये जपानने एका महिन्यासाठी टोकियो आणि इतर सहा शहरी प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली. यानंतर, संपूर्ण देशभरात याचा कालावधी हा ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला.
आता देशात संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी हे निर्बंध कमी करणे आवश्यक आहे असे पंतप्रधान अॅबे यांनी ठरवले आहे. त्यांना देशाची अर्थव्यवस्था आणि रोग प्रतिबंध यांच्यात संतुलन राखण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांनी लोकांना असा इशाराही दिलेला आहे की संक्रमणाची प्रकरणे पुन्हा समोर येऊ शकतील, म्हणून स्वत: ला सुरक्षित ठेवा. ते येत्या आठवड्यात आरोग्य तज्ज्ञांची बैठक घेणार असून उर्वरित भागातील निर्बंध हटवायचे की त्यांना तसेच राहू द्यायचे याचा निर्णय ते घेतील असे अॅबे यांनी सांगितले. त्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याचे आश्वासन दिले आहे. जपानमध्ये १६००० पेक्षा जास्त संसर्गाची प्रकरणे आहेत, तर साथीच्या आजारामुळे ६८० लोकांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.