Tuesday, January 31, 2023

धक्कादायक! विजेच्या तारेला धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

- Advertisement -

अंकली : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या परतीच्या पावसाने मोठया प्रमाणात थैमान घातले आहे. यामध्ये आता एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस (farmer died) आली आहे. काल आलेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी वीजवाहक प्रवाहित तार तुटून पडली होती. या तारेला एका शेतकऱ्याचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू (farmer died) झाला.

काय घडले नेमके?
हि मन हेलावून टाकणारी घटना कागवाड तालुक्यातील मोळे या ठिकाणी घडली आहे. सत्याप्पा रामा मुंजे असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कागवाड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. काल सायंकाळी हि दुर्दैवी घटना (farmer died) घडली. काल सायंकाळी सत्याप्पा रामा मुंजे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना शेतात तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

यावेळी ग्रामस्थांनी शेतातील विद्युत प्रवाहाकडे हुबळी विद्युत प्रसारण निगम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. यानंतर मृत शेतकऱ्याच्या (farmer died) नातेवाईकांनी विद्युत प्रसारण निगमच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कागवाड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास कागवाड पोलीस स्थानकाचे फौजदार रबकवी हे करत आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती