हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : 2019 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिकरित्या 6000 रुपये दिले जातात. मात्र ज्या शेतकऱ्यांनी नियमांनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत त्यांनाच हे पैसे दिले जातात. गेल्या काही दिवसांत या योजनेचा 13 वा हप्ताही केंद्राकडून ट्रान्सफर करण्यात आला आहे. मात्र असेही लाखो शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही या योजनेचे पैसे आलेले नाहीत.
काय करावे लागेल ???
हे जाणून घ्या कि, आधार क्रमांक, चुकीचा बँक खाते क्रमांक किंवा ई-केवायसी न मिळाल्याने काही पात्र शेतकऱ्यांचे पैसे थांबवण्यात आले आहेत. आता ही समस्या आपल्याला घरबसल्या सोडवता येईल. अनेक शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्ड मधील नावात बदल करायचा आहे. मात्र त्यासाठी नेमके काय करावे लागेल याची त्यांना माहीती नाही. आता आपल्याला बँक खाते, आधार क्रमांक आणि नावाशी संबंधित बदल ऑनलाइन करता येतील. PM Kisan
अशा प्रकारे अपडेट करा नाव
यासाठी सर्वात आधी PM Kisan च्या – https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर जा.
आता फॉर्मर्स कॉर्नरवर जाऊन लाभार्थीचे नाव बदलावर क्लिक करा.
येथे मागितलेला आधार क्रमांक आणि संबंधित माहिती भरा.
आधार डेटाबेसमध्ये सेव्ह केल्यानंतर नाव बदलण्यास सांगितले जाईल.
आधार डाटाबेसमध्ये सेव्ह होत नसेल तर जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा.
पुढील स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन नंबर, शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता इत्यादींशी संबंधित माहिती अपडेट करा.
आता KYC विचारले जाईल आणि ते अपडेट करण्यास सांगितले जाईल.
यानंतर आपले नाव, जन्मतारीख आणि मागितलेली सर्व माहिती अपडेट करा.
पुढील स्टेपमध्ये आधार सीडिंग तपासले जाईल.
जर आपले खाते बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर ते लिंक करण्यास सांगितले जाईल.
हप्ता न मिळाल्यास इथे करा कॉल
जर आपल्या खात्यामध्ये PM Kisan सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता आला नसेल तर 011-24300606 या नंबरवर कॉल करून आपली तक्रार दाखल करता येईल. यावेळी 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 हजार कोटींहून जास्तीची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले
Lunar Eclipse : वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ दिवशी होणार, जाणून घ्या त्याविषयीची महत्त्वाची माहिती
आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव