Mukesh Ambani : Disney सोबतच्या करारानंतर रिलायन्स आणखी एक मोठा सौदा करणार; मनोरंजन क्षेत्रात दबदबा वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mukesh Ambani) देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे कायम कंपनीच्या विस्तारासाठी कार्यरत असतात. आजपर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय हे कायम कंपनीच्या हिताचे ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजने अनेक जागतिक ब्रँड्ससोबत बिजनेस केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ही कंपनी जागतिक स्तरावर विस्तारताना दिसतेय.

(Mukesh Ambani) अलीकडेच रिलायन्सने डिस्नीसोबत करार करून मनोरंजन क्षेत्रात जागा तयार केली आहे. यानंतर आता रिलायन्स कंपनीने मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात विस्तार वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार केला आहे. यानुसार रिलायन्स कंपनी लवकरच वायकॉम 18 मीडियामध्ये पॅरामाऊंट ग्लोबलमधील 13% हिस्सा खरेदी करणार असल्याचे समजत आहे.

वायकॉम 18 मध्ये 13% हिस्सा खरेदी (Mukesh Ambani)

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस डिस्नीसोबत कोट्यवधींचा करार केला होता. या करारानंतर मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात आपला विस्तार वाढविण्यासाठी मुकेश अंबानी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने वायकॉम 18 मध्ये ग्लोबल पॅरामाऊंटचा 13.01 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.

आणखी एक मोठी गुंतवणूक

काही महिन्यांपूर्वीच रिलायन्स ज्वाईंट व्हेंचरमध्ये ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. (Mukesh Ambani) यानंतर आता एका वृत्तानुसार, पॅरामाऊंट ग्लोबल इंडिया त्यांच्या मीडिया ज्वाईंट व्हेंचरमधील स्वतःचा हिस्सा रिलायन्स कंपनीला विकण्याचा विचार करत असल्याचे समजत आहे. याविषयीची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र अंतिम टप्प्यात असलेला विचार लवकरच अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल.

दरम्यान, वायकॉम 18 मीडियामध्ये पॅरामाऊंट ग्लोबलची एकूण हिस्सेदारी खरेदीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मोठी गुंतवणूक करणार आहे. माहितीनुसार, यासाठी रिलायन्स कंपनी 517 दशलक्ष डॉलर किंवा 42 अब्ज रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करेल असे सांगितले जात आहे.

मनोरंजन क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा वाढणार

एका वृत्तानुसार, पॅरामाऊंट ग्लोबलशी संबंधित रिलायन्सचा हा करार डिस्नीसोबत असलेल्या करारानंतर पूर्ण होऊ शकतो. एका अमेरिकन कंपनीने बुधवारी या करारासंबंधित माहिती प्रदान केली आहे. या वृत्तानुसार, पॅरामाऊंट प्रोगामिंग परवाना वायकॉम 18 देणार आहे. आत्ताच्या घडीला वायकॉम18 कडे एकूण 40 चॅनल्स आहेत. ज्यामध्ये पॅरामाऊंटची हिस्सेदारी आहे. त्यामुळे जर रिलायन्सचा हा करार पूर्णत्वास आला तर नक्कीच मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा निर्माण होईल. (Mukesh Ambani)