हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । वेलचीचे दोन प्रकार आहे. मसाले वेलची आणि गोड वेलची . वेलची हा पदार्थ स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. आहारातील पदार्थाचा स्वाद , चव आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. चहामध्ये सुद्धा वेलची टाकून पिल्याने चहा ची चव छान लागते. कोरोनाच्या काळात जर या आजारापासून वाचायचे असेल तर काडा टाकून तयार केलेले पाणी पिले पाहिजे. अनेक पदार्थांमध्ये वेलची चा वापर केला जातो. वेलचीचे अनेक बहुउपयोगी गुण आहेत. अनेक आजरापासून दूर राहण्यसाठी वेलची खाल्ली गेली पाहिजे.
— वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते.
— जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं आराम मिळतो.
— वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते.
— वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.
— चहात टाकून वेलची घेतल्याने पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते.
— वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो.
— वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. त्याचा शरीराला जास्त फायदा होतो.
— शरीरातील लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची खाणं गरजेचे आहे .
— हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते.
— वेलची पित्तावर रामबाण उपाय आहे. पित्त झालं असेल अथवा मळमळत असेल तर तोंडात वेलची ठेवावी.
— ऍसिडिटी पासून जर शरीराला अराम हवा असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले.
— वेलची चावून खाल्याने त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.
— वेलची खाण्यामुळे सेक्स लाईफ सुधारते असंही म्हटलं जातं.
— वेलचीत अँटी बॅक्टरील गुण असतो. त्यामुळे तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’