रोज रात्री दोन केळी खाण्याचे आहेत ‘हे’ जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा वजन वाढवायचे असेल तर फळे खावा ड्राय फ्रुटस खावा असे अनेक पर्याय पर्याय दिले जातात. पण हे पर्याय कधी कधी सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नसतात. वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र त्याकडे वारंवार दुर्लक्ष करतो. केळ हे आरोग्यासाठी फादेशीर आहे. प्रत्येक ऋतुमध्ये आणि सर्व ठिकाणी अगदी सहजरित्या उपलब्ध असणाऱ्या फळांमधील एकमेव फळ म्हणजे केळ आहे.

केळामध्ये अनेक पोषकतत्व असतात. तसेच अनेक जीवनसत्वांनी भरलेले हे फळ आहे. यामध्ये प्रथिनं, खनिजं, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला ऊर्जा देण्याची शक्ती यामध्ये असते. दोन केळी खाल्ली की ऊर्जा मिळते आणि भूकही शमते. त्यामुळे अति भूक लागल्यानंतर केळ खाऊ नये त्यामुळे भूक मरते असंही तज्ज्ञ सल्ला देतात. केळीचे अनेक पदार्थ बनवले जातात. कच्या केळीच्या सालापासून चिप्स बनवले जातात. तसेच त्याच्यापासून अनेक वेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. पिकलेल्या केळीपासून शेक बनवला जातो . तो पचायला फार हलका असतो. सहजरित्या हा शेक पचतो आणि त्यापासून एनर्जी सुद्धा मिळते.

–केळ्यानं शरीराला ऊर्जा मिळते.

–शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

–पिकलेली केळी खाल्ल्यानं शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढतात.

— पिकलेल्या केळ्यात पोटॅशियम जास्त असतं. सोडियम कमी असतं.त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

— शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. शरीराचं मेटॅबोलिजम चांगलं राहतं.

— केळं हे आरोग्याला चांगलं असतं. पण ज्या केळ्यांवर काळे डाग पडलेले असतात, त्याचा आरोग्यासाठी जास्त फायदा होतो.

— केळ्याने बद्धकोष्टतेचे आणि पोटाचे विकार दूर होतात. रोज दोन केळी खाल्लानं पोट साफ होण्यास मदत होते.

— हाडकुळ्या व्यक्तींना वजन वाढवायचे असेल तर रोज दुपारी चार केळी खावीत. यामध्ये भरपूर उष्मांक असल्याने महिन्याभरात वजन वाढते.

–जास्त पिकलेली केळी खाल्ली की कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. माणसाची रोग प्रतिकारशक्ती वाढते.

–मासिक पाळीच्या वेळी होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास कमी करण्यासाठी पिकलेलं केळं फायदेशीर ठरत.

— भाजलेल्या ठिकाणी केळ्याची साल अथवा केळ लावावं. शरीराचा दाह कमी होण्यासाठी मदत होते.

— केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोह भरपूर प्रमाणात असल्याने हाडांना मजबूती मिळते.

— केळ्याचा गुणधर्म थंड असल्यानं काहीवेळा केळ खाल्ल्यानं सर्दी खोकला होतो. अशावेळी केळ्यासोबत मध किंवा तूप घ्यावं .

Leave a Comment