हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लिंबूमध्ये औषधी गुणधर्म असतात. लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते. त्यामुळे अनेक घरगुती उपचारांमध्ये लिंबूचा सर्रास वापर केला जातो. पण याशिवाय महिलांच्या सौंदर्यात लिंबूचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो. अनेक पदार्थांमध्ये केला जातो. लिंबूचा रस त्वचेच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो. केसांमध्ये लिंबूचा रस लावल्यास कोंड्याची समस्या दूर होऊन केसांचे आरोग्य सुधारते. शरीराच्या दुर्गंधीवर उपाय म्हणून आपण लिंबूचा वापर करु शकतो. मेनीक्यूअर-पेडीक्यूअरमध्ये लिंबूचा वापर नखांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो.
लिंबूच्या रसात ऍसिड चे गुणधर्म असल्याने नैसर्गिकरित्या ब्लॅकहेड्स काढून टाकले जातात. सतत लिपस्टिकच्या वापराने आपले ओठ काळे पडतात अशावेळी ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठीही आपण लिंबूच्या रसाचा वापर करु शकतो. तसेच लिंबू हे खाण्यासाठी जास्त उपयोगी असते. लिंबाच्या जर आहारात समावेश केला तर तुमचे शरीर निरोगी राहते. तसेच जर लिंबू आणि पाणी याचा समावेश असेल तर शरीराला ग्लुकोज पुरवण्याचे काम लिंबू करते.
लिंबाच्या लोणच्याचा सुद्धा शरीराला जास्त फायदा होतो. लिंबू खाण्याने शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. असिटीटी सारखा त्रास होत नाही. अनेक वेळा लिंबाचा वापर आपल्या चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. परंतु लिंबू वापरताना ते फक्त लिंबाचा रस वापरला जाणार नाही याची काळजी घ्यावी त्याच्यासोबत पीठ आणि हळद टाकून काही प्रमाणात लिंबाचा रस टाकून त्याचा वापर शरीरासाठी करावा . लिंबाच्या रसाने जर नखे घासली गेली तर नखे सुद्धा छान दिसायला सुरुवात होतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’