नियमित व्यायाम केल्याचे आरोग्याला आहेत “हे” जबरदस्त फायदे

Benefits of Regular Exercise in Marathi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | सद्यस्थितीत लोकांच्या आयुष्यात व्यायाम हा अत्यंत परवलीचा शब्द तयार झाला आहे. कोरोना महामारिमुळे लोकांना आता आरोग्याचे महत्व चांगलेच कळले आहे. बर्‍याचदा आपण नवीन वर्षाला किंवा वाढदिवसाला व्यायाम करण्याचा संकल्प करतो. मात्र उद्यापासून करु म्हणत संकल्प प्रत्यक्षात उतरवणे राहून जाते. व्यायाम सर्वांना करायचा असतो पण वेळेच्या अभावामुळे प्रत्येकाला नियमित व्यायाम शक्य होत नाही. मात्र नियमित व्यायामाचे भरपूर फायदे आपल्यासाठी आहेत. Benefits of Regular Exercise in Marathi

अनेकदा उत्साहाच्या भरात व्यायामासाठी लागणारे कपडे, शूज, सायकल, फिटनेस ट्रॅकर आणि इतर ऍक्सेसरीज खरेदी केल्या जातात. नंतर वेळ येते ती प्रत्यक्ष व्यायाम करायची. जवळचे एखादे मैदान, कमी वर्दळीचा रस्ता याठिकाणी उपस्थिती लावली जाते आणि काही दिवस उत्साहाने रोजच्या रोज व्यायामाची दैनंदिनीचे पालन केले जाते. पण हळूहळू हा उत्साह मावळायला सुरवात होते अन् व्यायामात चालढकल चालू होते. व्यायाम हि एक रोजची कटकट वाटू लागते आणि मग एखाद्या दिवशी मोठ्या उत्साहाने सुरु केलेला व्यायाम बंद केला जातो आणि नंतर तो पुढील संकल्पापर्यंत बंदच राहतो. Benefits of Regular Exercise in Marathi

चांगली सुरवात करून नंतर व्यायाम बंद करणे हे आरोग्यासाठी नक्कीच चांगले नाही. वयाच्या तिशी नंतर अनेक आजार हे आ वासून आपल्यासमोर उभेच आहेत. त्यांना टाळायचे असेल तर सर्वात जालीम उपाय म्हणजे व्यायाम ! कारण तरुणपणापासून मध्यमवया पर्यंत जर आपला फिटनेस उत्तम असेल तर उतारवयात अथवा वृद्धावस्थेत होणाऱ्या रोगाचे किंवा आजाराचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. व्यायामामुळे शारीरिक हालचाल वाढून शारीरिक शक्ती, समतोल, समन्वय साधला जातो. तसेच आपणांसर्वांना माहीतच आहे कि सीव्हीडी, टाईप २ मधुमेह, लठ्ठपणा, काही प्रकारचे कॅन्सर टाळणे सहज शक्य होते. व्यायामाच्या अभावाने शरीरात चरबी वाढायला सुरवात होते. पुरुषामध्ये पोटापाशी तर महिलांमध्ये हि चरबी शरीरात सर्वत्र पसरते. Benefits of Regular Exercise in Marathi

काही प्रकारच्या व्यायामाचा फायदा सांधे, हाडे याचबरोबर पचनसंस्थेला पण होत असतो. डिप्रेशन आणि मानसिक आरोग्य यावर देखील नियमित व्यायाम अति लाभकारक आहे. आठवड्यात कमीत कमी पाच दिवस ३० ते ४५ मिनिटे व्यायामाला देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नृत्य, योगा, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम याचा समावेश केल्यास अति उत्तम !