अरे ही कसली दोस्ती! कमी मटण खाल्लं म्हणून मित्रालाच पेटवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 अहमदनगर प्रतिनिधी । ‘ये दोस्ती सलामत रहेगी, ये दोस्ती हम नही तोडेंगे, यांसारखी गाणी किंवा म्हणी आपण ऐकल्या असतील पण, अहमदनगर मध्ये मंत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी अशी एक घटना घडली की तिने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीय.त्यामुळे हे नेमकं मित्र म्हणायचे की हत्यारे हा प्रश्न उपस्थित होतो.

अहमदनगर मध्ये आपल्या घरी जेवायला बोलावलेल्या मित्राने कमी मटण खाल्ले म्हणून त्याला पेटून देण्याची अमानुष घटना समोर आली आहे.या घटनेत जखमी झालेल्या ४८ वर्षीय संजय जाधव यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापू एकनाथ हराळ आणि ज्ञानदेव उत्तम कुसळकर यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता संजय जाधव यांना जेवणासाठी घरी बोलावले. यावेळी जेवनासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे तिघे ही जेवायला बसले असता हारळ व कुसळकर यांनी जाधव यांना जास्त मटण वाढले. मात्र, जाधव यांचे पोट भरल्याने त्यांनी मटण खाण्यास नकार दिला. याचा हाराळ आणि कुसळकर यांना राग आल्याने त्यांनी जाधव यांना मटण का खाल्ले नाही असे विचारत चक्क मारहाण केली.

मारहाण करूनही त्यांचं समाधान झालं नाही, त्यामुळे या दोन माथेफिरुनी संजय यांना रामेश्‍वर मंगल कार्यालयात आणले तेथे त्यांनी जाधव यांना टोकदार वस्तूने गंभीर दुखापत केली. आणि त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या घाटनेत जाधव गंभीर जखमी झाले. त्यामुळे जाधव यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जाधव यांनी दिलेल्या जबाबावरून या दोन माथेफिरू विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची बातमी तालुक्यात पसरल्याने एकच खळबळ उडाली.